Q-What's this?
A-This is a pen.
Q-What do you do with it?
A-I write with it.
Q-Where do you get it?
A-in a shop.
सुलभक गजानन
MYSELF |
---|
WELCOMES YOU ALL YOU WILL GET HERE LEARNING EXPERIENCES & OUTCOMES CONDUCTED BY MY TEACHERS IN THEIR CLASSROOMS |
बुधवार, ४ मार्च, २०१५
CONVERSATION TIME
मंगळवार, ३ मार्च, २०१५
सुचतं ते लिहा-एक उपक्रम
'सुचतं ते लिहा'...या उपक्रमांतर्गत आज इयत्ता ३ रीत शिकणा-या रोहनने बडबडगीत लिहिलेय.यापूर्वी ३ रीतील आरती व सौरभ या विद्यार्थ्यांनी कविता लिहिलेल्या आहेत तर ५ वीत शिकणा-या श्रीरामने सामान्य विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात दिलेल्या विविध मातीप्रकारात स्वत:च्या परिसरात आढळून येणा-या मातीविषयीची माहिती समाविष्ट करुन घेण्याबाबत पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या संचालकांना पत्र लिहिले होते.
...पोरांनो,,,जे सुचतं ते लिहा,,,लिहीत राहा...शाब्बास पोरांनो...शाब्बास..!
रविवार, १ मार्च, २०१५
उपक्रम माझा.
*STANDARD-5th
(semi english medium)
*SUBJECT-MATHEMATICS
*UNIT-ANGLE and TRIANGLE.
*TL AID- LADDER & SLIDE in the school yard.
Angle & Triangle ('कोन व त्रिकोण') ह्या संकल्पनांच्या दृढीकरणासाठी मला पारंपारिक शैक्षणिक साधनांच्या तुलनेत शाळेच्या आवारातील घसरगुंडीचा वापर अधिक परिणामकारक ठरू शकेल असे वाटले.चार भींतीच्या आड रोज त्याच त्या खडुफळ्यांचा वापर करण्याचा खरेतर मलाच कंटाळा आला होता.मग काय,"चला पोरांनो आवारात घसरगुंडीकडे..आपण काहीतरी शिकुया..!" असे म्हणून आवारात आलो..पोरांना आपण नेमके काय शिकणार आहोत याची पूर्वकल्पना जाणीवपूर्वक दिलेली नव्हती..त्यामुळे पोरांच्या
चेह-यावर कमालीची उत्सुकता दिसत होती.त्यांच्यातील शिकण्याच्या उत्सुकतेचा लाभ घेण्याचे ठरवून सुलभकाच्या भुमिकेतून पुढील कृतीचे आयोजन केले..
पोरांकडून angle म्हणजे 'कोन' व triangle म्हणजे 'त्रिकोण' असे घोकुन न घेता घसरगुंडीचे दोन सरळ खांब म्हणजे line segments ज्या एकाच ठिकाणी परस्परांना जोडलेले आहेत त्या ठिकाणाकडे अंगुलीनिर्देश करुन त्यास vertex (कोनाचा शिरोबिंदु) व त्यामुळे तयार झालेल्या
कोप-याला angle (कोन) म्हणायचे..असे पोरांना सुचवले.
बस्स..मी फक्त एवढेच केले..मग पोरं स्वत:च घसरगुंडीच्या विविध भागात दिसणारे vertex व angles मला दाखवायला व सांगायला लागलीत..याचपद्धतीने पुढे Triangle व Elements of Triangle हे संबोध स्पष्ट केलेत.त्यासाठी खांबांवर खडुने रेषाखंड काढून घेतले व सोयीसाठी त्यावर points दाखवून त्यांना इंग्रजी A,B,C अशी नावे दिलीत व संबंधीत आकृत्यांचे वाचन कसे करायचे हे समजावून सांगितले..संबोध स्पष्ट झालेत कि नाही याची चाचपणी करण्यासाठी पोरांना वहीवर Angles व Triangles काढून त्यांचे विविध पद्धतीने वाचन व लेखन करावयास दिले...तपासणीअंती पोरांनी आकृत्यांचे अगदी अचूक वाचन/लेखन केल्याचे मला दिसले..हीच माझ्या अध्यापनाची अध्ययन निष्पत्ती...
या तासिकेत पोरांना पुढील बाबींचे आकलन झाले..
1.Angles
2.Elements of angle.
3.Triangle
4.Elements of Triangle.
5.Different methods of reading/writing Angles & Triangles.
-गजानन बबनराव बोढे,सहशिक्षक,प्रा.शा.भानुसेवस्ती.(टाकळी जिवरग)
LEARN TO MAKE & READ TWO DIGIT NUMBERS
